पूर्व उच्च प्राथमिक आणि माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा अंतिम निकाल व गुणवत्ता यादी प्रसिद्ध

Maharashtra-Rajya-Pariksha-Parishad-Pune. हडपसर मराठी बातम्या

Pre Higher Primary and Secondary Scholarship Examination Final Result and Merit List Released

पूर्व उच्च प्राथमिक आणि माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा अंतिम निकाल व गुणवत्ता यादी प्रसिद्ध

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) परीक्षेचा अंतिम निकाल व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता याद्या परिषदेच्या www.mscepune.inhttps://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.Maharashtra-Rajya-Pariksha-Parishad-Pune. हडपसर मराठी बातम्या

१२ फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी ) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (इ. ८ वी ) परीक्षेचा अंतरिम (तात्पुरता) निकाल २९ एप्रिल रोजी जाहीर करण्यात आला होता. या निकालाच्याअनुषंगाने २९ एप्रिल २०२३ ते ९ मे २०२३ या कालावधीत संबंधित शाळेमार्फत गुणपडताळणीसाठीचे ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. प्राप्त अर्ज निकाली काढून या परीक्षांचा अंतिम निकाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अंतिम निकालावरून शासनमान्य मंजूर संचांच्या अधीन राहून शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीही तयार करण्यात आली आहे.

या परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यास अंतिम निकाल परिषदेच्या या संकेतस्थळावर वैयक्तिकरित्या स्वतःचा बैठक क्रमांक टाकून बघता येणार आहे. तसेच शाळांना त्यांच्या लॉगीनमध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचा निकाल एकत्रितपणे बघता येणार आहे. तथापि शिष्यवृत्तीधारक झालेल्या विद्यार्थ्याचे गुणपत्रक त्याच्या बँक खात्याची व आधार क्रमांकाची माहिती भरल्याशिवाय पाहता किंवा डाऊनलोड करता येणार नाही. संकेतस्थळावरील गुणवत्ता यादीत त्याला स्वतःचा शिष्यवृत्ती संच प्रकार (अर्हता) बघता येणार आहे.

संकेतस्थळावरील प्रसिद्ध करण्यात आलेली शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची माहिती, तसेच इतर अनुषंगिक माहितीची लिंक पुढीलप्रमाणे आहेत. अंतिम निकाल (विद्यार्थ्यांसाठी), गुणवत्ता यादी (राज्यस्तरीय,जिल्हास्तरीय,तालुकास्तरीय) शाळा सांख्यिकीय माहिती (जिल्हानिहाय,तालुकानिहाय) विद्यार्थी, पालक, शाळा, क्षेत्रिय अधिकाऱ्यांना लिंकवर क्लिक करून माहिती डाऊनलोड करता येईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेच्या उपायुक्त शैलजा दराडे यांनी दिली आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
कृषी विभागात सरळसेवेने विविध पदभरतीसाठी अर्ज करण्यास २२ जुलैपर्यंत मुदत
Spread the love

One Comment on “पूर्व उच्च प्राथमिक आणि माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा अंतिम निकाल व गुणवत्ता यादी प्रसिद्ध”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *